तामिळनाडू येथील वानियाम्बादी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अचानक चेंगराचेंगरी होऊन चार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काही महिला जखमी झाल्या आहेत.
थैपूयम येथील एका खासगी संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत होतं. याचवेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साड्या मिळवण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती आणि अनेक महिलांनी व्यासपीठाकडे धाव घेतली त्यामुळं चेंगराचेंगरी झाली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
याचवेळी अचानक घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेकींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्येही काहींची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच, पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. तसंच, दोषींवर कायद्यानुसार कारवाई होईल. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती तरीही कार्यक्रम कसा झाला, याचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, थाईपुसम हा एक सण असून हिंदू तामिळ समजाकडून तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. याच उत्सवासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याचवेळी ही दुर्घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी वानियाम्बडी दुर्घटनेत प्राण गमावणाऱ्या महिलांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…