विहिरीत पाणी काढण्यासाठी उतरलेला भावाला बुडताना पाहून काठावर असलेल्या भावाने मदतीसाठी हात दिला अन् दोघांचाही घात झाला. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना देवणी तालुक्यातील हंचनाळ शिवारात घडली. नरसिंग युवराज चव्हाण (वय २०) आणि संगमेश्वर संजय चव्हाण (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
हंचनाळ शिवारातील रसिका महाविद्यालयाच्या पाठीमागील रमेश बिरादार यांचं शेत आहे. शेतात पाण्याने भरलेली विहीर आहे. या विहिरीचं पाणी आणण्यासाठी देवणीतील चुलत भाऊ नरसिंग चव्हाण आणि संगमेश्वर चव्हाण हे दोघे भाऊ गेले होते. पाणी काढण्यासाठी नर्सिंग विहिरीत उतरला. मात्र, त्याचा तोल गेला अन् तो पाण्यात पडला.
पण, त्याला पोहता येत नसल्याने नरसिंग बुडू लागला. आपला भाऊ आपल्या डोळ्यादेखत बुडत असल्याचे पाहून संगमेश्वरने क्षणाचाही विलंब न करता बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी हात देण्याचा प्रयत्न केला. पण, या प्रयत्नात त्याचाही तोल गेला अन् तोही पाण्यात पडला. मात्र, दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यातच काळाने डाव साधला अन् दोन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय देवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर देवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देवणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश उस्तुर्गे करत आहेत. एकाच घरातील दोन तरुण भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…