ताज्याघडामोडी

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीची विषप्राशन करीत आत्महत्या; कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.  शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. निलेश माझीरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केलं होतं, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी दुर्दैवानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्रथामिक अंदाज वर्तवला जात आहे.

शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

निलेश माझिरे हे शिंदे  गटाचे पदाधिकारी आहेत. ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे. सध्या त्यांच्याकडे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

17 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago