ताज्याघडामोडी

पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातील रस्त्याच्या कामांसाठी ३४ कोटींचा निधी मंजूर

आमदार समाधान आवताडे यांचा यशस्वी पाठपुरावा 

मतदार संघाचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय -मोहन बागल

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ अंतर्गत मतदारसंघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या माध्यमातून ३४ कोटी ३१ लाख रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते घायाळ वस्ती या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व दर्जा सुधारणा करण्यासाठी ३ कोटी कोटी ५२ लाख रुपये, तसेच रामा १४३(फूट रस्ता)ते गादेगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी ४ कोटी ६५ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव शेलेवाडी,आसबेवाडी ते मारापूर या रस्त्यासाठी ९ कोटी ४४ लाख, दामाजी कारखाना चौक ते ब्रह्मपुरी ८ कोटी ३ लाख, मंगळवेढा ते मुंढेवाडी व ते तामदर्डी तांडोर ८ कोटी ४ लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे.

आ. आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून यापूर्वीही राज्य शासनाच्या विविध विकासाभिमुख योजनांतून पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि पायाभूत विकासासाठी केंद्रस्थानी असणाऱ्या रस्ते विकासासाठी आ. आवताडे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. आ. आवताडे यांच्या रस्ते विकास अनुषंगाने विकासाभिमुख दूरदृष्टीतील कार्यात्मक भूमिकेमुळे सध्या वाहतूक रहदारीसाठी येत असलेले अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी आ. आवताडे यांनी राज्य शासनाकडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आ. आवताडे यांच्या या मागणीवरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना निधीतून सदर निधी मंजूर झाला आहे.
पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल आणि व्यापक पद्धतीने विकास व्हावा याकडे आपले वैयक्तिक लक्ष असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार आहे. मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला तो मी माझ्या कामातून सार्थ ठरविणार आहे. येत्या काळात केंद्र व राज्य शासनामार्फत उर्वरित रस्ते कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार आहे. आ. आवताडे यांच्या विकास दृष्टीमुळे शासनाकडून एवढा भरीव आणि मोठ्याप्रमाणातील निधी पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विकास कामांना मिळाल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

 अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये वाढता संपर्क व दळणवळणाच्या सुविधा या बाबी लक्षात घेता सुव्यवस्थित व दर्जेदार रस्ते बांधणी ही काळाची गरज बनली आहे. मतदार संघातील जनतेच्या या भौतिक सुविधांचा विचार करून आमदार समाधान आवताडे हे नेहमीच सहकार्य कौशल्याने आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत असतात. आमदार अवताडे यांची ही विकासदृष्टी पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थी यांना नियोजन जागी पोहोचण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे – मोहन आप्पा बागल ( सरपंच, ग्रामपंचायत गादेगांव ता – पंढरपूर)

❤️TITAN EDGE CERAMIC❤️
SLIMMEST CERAMIC WATCH IN THE UNIVERSE
💫💫AVAILABLE ON OFFER💫💫

टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago