ताज्याघडामोडी

आधीच परीक्षेचं टेन्शन, त्यात परीक्षा केंद्रावर फक्त 500 मुलीच, एकटा मुलगा घाबरुन पडला बेशुद्ध

परीक्षा देण्यासाठी पोहचलेल्या केंद्रावर 500 मुलींमध्ये एकच मुलगा होता. परीक्षा आणि या मुलींचं टेन्शन घेऊन हा मुलगा चक्क बेशुद्ध पडल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ही घटना आहे. या सगळ्या गोंधळातच या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता या प्रकाराची चर्चा सगळीकडे रंगते आहे.

बिहारशरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजचा विद्यार्थी मनीस शंकर हा इंटर परीक्षेसाठी केंद्रावर पोहचला. त्याला ब्रिलियन्ट स्कूल हे केंद्र मिळालं होतं. मनीष सकाळी जेव्हा केंद्रावर पोहचला तेव्हा त्याला सगळीकडं मुलीच दिसत होत्या. सुमारे 500 मुली या केंद्रावर होत्या. आणि त्यात मनिष हा एकटाच मुलगा होता. आधीच परीक्षेचं टेन्शन आलेल्या मनिषला या मुलींमुळे अधिकचं टेन्शन आलं. त्याची प्रकृती बिघडली आणि तो परीक्षा केंद्रावरच बेशुद्ध पडल्याची घटना घडली.

परीक्षा केंद्रावर जास्त मुली पाहिल्यानं मनिष घाबरला आणि त्यामुळं तो बेशुद्ध पडला अशी माहिती त्याच्या काकूनं दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये अपचार करण्यात आले आणि आता त्याची प्रकृती ठीक असल्याचंही त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. एकूणच मुलींचं टेन्शन घेून चक्कर येऊन पडलेल्या या मुलाची चर्चा सध्या चांगलीच रंगते आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago