चारित्र्याच्या संशयावरून गळा चिरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे घडली आहे. पत्नीची हत्या करत पतीने स्वतःवर देखील वार केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ममता देवी प्रसाद (वय ४०) असे मृत महिलेचं नाव आहे.
बोईसर येथील दांडीपाडा परीसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिचा गळा चिरला व त्यानंतर त्याने स्वतःवरही वार केले. पतीने आपल्या दोन चिमुकल्यांच्या डोळ्यांसमोरच हे भयावह कृत्य केले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गळा चिरल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने हल्ला करत गळा चिरून पत्नीची हत्या केली असून सीताराम प्रसाद (वय ४५) असं आरोपी पतीचं नाव आहे. पत्नीची हत्या करून पतीने स्वतःवरही वार केल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आहे.
परिसरातील स्थानिक नागरिकांनी या सर्व घटनेची माहिती बोईसर पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. गंभीररीत्या जखमी झालेल्या पतीला देखील बोईसर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…