जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवरे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणाऱ्या पत्नीची नातेवाईकांनी तोंडाला काळं फासून धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
शिवरे गावातील एका महिलेच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं. यावेळी त्याची पत्नी माहेरी होती. पत्नीने पतीची आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. यामुळं तिच्या सासरच्या नातेवाईकांनी राग मनात ठेवून पतीच्या नातेवाईकांनी महिलेच्या तोंडाला काळे फासून चपलांचा हार घालत गावात धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात राहणाऱ्या पीडित महिलेच्या गाडीचा अपघात काही दिवसांपूर्वी झाला होता. अपघातात तिच्या हाताला दुखापत झाली असल्याने तिच्या पतीने तिला माहेरी सोडले होते. त्यानंतर काही दिवसांनी पतीने आत्महत्या केल्याची बातमी पीडित महिलेला समजली. संबंधित महिला पतीच्या दशक्रिया विधीसाठी महिला गावात पोहचली होती, मात्र पतीच्या नातेवाइकांनी तिला मारहाण केली.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पतीच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या पत्नीनं तिचा पती आत्महत्या करू शकत नाही, त्यांचा घातपात झाला आहे, असा संशय व्यक्त केला. तिनं पतीच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी सुरु केली.
चौकशीच्या मागणीमुळं संतप्त झालेल्या पतीच्या नातेवाइकांनी महिलेसह मुलांना आणि तिच्या नातेवाईकांना मारहाण केली आहे. इथंवरच हे प्रकरण न थांबता पतीच्या नातेवाइकांनी संबंधित महिलेच्या तोंडाला काळे फासले. तिच्या गळ्यात चपलांचा हारही घातला आणि गावभर धिंड काढली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…