ताज्याघडामोडी

पोलीस होऊन कुटुंबाची स्थिती सुधारायची होती, पण नियतीने घात केला अन् तरुणासोबत घडलं विपरीत

पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणाचा रस्त्यावर धावतांना अपघाती मृत्यू झाला आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव येथे सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहित अशोक मराठे (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे. रस्त्यावर धावण्याचा सराव करतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

कजगाव येथे रोहित अशोक मराठे हा कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. रोहित याचे पोलीस होण्याचे स्वप्न असून पोलीस भरतीसाठी तो सराव करत होता. सोमवारी सकाळी रोहित हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. यादरम्यान चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला मागून जोरदार धडक दिली.

वाहनाच्या जोरदार धडकेत रोहित मराठे याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी रोहित सोबत असलेल्या वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दादाभाऊ पाटील, रवी मालचे, अशोक पाटील हे सुध्दा मदतीला धावले होते. जखमी रोहितला पुढील उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रस्त्यातच रोहितची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago