Categories: Uncategorized

शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज

TAIT Exam News : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे.  TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. (Maha TAIT Exam 2023) शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे.   शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- 2022  या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

  • अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी, पदविका, पदवी आदी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
  • परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती आणि कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • या परीक्षेला आणि पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

TAIT Exam चे वेळापत्रक पाहा

  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी – 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी – 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
  • प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी – 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
  • ऑनलाईन परीक्षा तारखा – 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)

गेल्या पाच वर्षांत दुसरी TAIT Exam घेतली नव्हती ती आज जाहीर झाली आहे. खर तर पहिली परीक्षेनंतर दुसरी परीक्षा सहा महिन्याने व्हायला पाहिजे आणि त्यानंतर चार महिन्याने परीक्षा होणे आवश्यक होते. मात्र, आज ही दुसरी TAIT जाहीर झाली. यासाठी वेळोवेळी युवाशाही संघटना  पाठपुरावा करत होती. अखेर त्यांना यश आले. यासाठी संघटनेने मुंबईत जलसमाधी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.आता ही परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

⚡⚡चष्मा आणि सनग्लास आता
बजाज फायनान्सवरती 0 डाऊन पेमेंट ,
0 % व्याज दरात उपलब्ध⚡⚡⚡
RAYBAN,STEPPER,VOUGE,
MAUI JIM SUNGLASS AVAILABLE

👓मोफत नेत्र तपासणी👓
👓चष्म्यासाठी मोफत इन्शुरन्स👓

आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago