ताज्याघडामोडी

अदानी समूह मोठ्या अडचणीत; एलआयसी आणि भारतीय बँका बुडणार का?

अदानी समूहावर बँकांचं २ लाख कोटी रुपयांहून अधिकचं कर्ज

हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूह अडचणीत आला आहे. शेअर बाजारात समूहाची जोरदार घसरण सुरू आहे. अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या कामगिरीवर हिंडनबर्ग रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा परिणाम झाला आहे. अदानी समूहाला कर्ज देणाऱ्या बँकांनीदेखील त्यांना देण्यात आलेल्या कर्जाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

आवश्यकता भासल्यास अदानी समूहाला कर्ज देणाऱ्या बँकांकडून योग्य पावलं उचलण्यात येतील, असं इंडियन एक्स्प्रेसनं वृत्तात म्हटलं आहे. अदानी समूहावर बँकांचं २ लाख कोटी रुपयांहून अधिकचं कर्ज आहे. अदानी समूहाला देण्यात आलेलं कर्ज आरबीआयनं दिलेल्या लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्कपेक्षा (एलईएफ) कमी असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियानं सांगितलं आहे. एखाद्या कॉर्पोरेट घराण्याला बँक कमाल किती कर्ज देऊ शकते, याला लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्क म्हणतात. याशिवाय ट्रस्ट आणि रिटेंशन अकाऊंट म्हणजेच टीआरएचा विचार केल्यास बँकांची संपत्ती सुरक्षित असून अदानी समूहाकडून उधारी वसूल करताना त्यांना अडचणी येणार नाहीत.

अदानी समूहावर झालेल्या आरोपांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. बँकेच्या जोखीमवर परिणाम करू शकतील असे प्रकार समोर आल्यास आमच्याकडे त्या कंपनीची वर्तमानातील जोखीमचं मूल्यांकन करण्याची आणि काही उपाय करण्याची प्रक्रिया असते, असं एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आम्ही किती सुरक्षित आहोत आणि त्याचा काय प्रकारचा प्रभाव पडू शकतो, यावर आताच भाष्य करणं घाईचं होईल. मात्र आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत, अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिलं.

 ‘अदानी समूह बहुतांश अधिग्रहण प्रक्रिया परदेशी बँकांकडून कर्ज घेऊन पूर्ण करत आहेत. त्यामुळे भारतीय बँकिंग यंत्रणेला धोका नाही,’ असं स्वामीनाथन म्हणाले. इन्व्हेस्टमेंट फर्म सीएलएसएच्या अहवालानुसार, अदानी समूहाच्या पाच आघाडीच्या कंपन्या असलेल्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन यांच्यावर एकूण २.१ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. अदानी समूहावरील एकूण कर्जापैकी केवळ ४० टक्के कर्ज भारतीय बँकांचं आहे.

एलआयसीनं अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ मध्ये एलआयसीचा एकूण इक्विटी पोर्टफोलियो १०.२७ लाख कोटी रुपये होता. यातील ७ टक्के रक्कम एलआयसीनं अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवली आहे. अदानी समूह संकटात सापडला असताना एलआयसीनं सोमवारी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘अदानी समूहातील आमची गुंतवणूक एकूण असेट्स अंडर मॅनेजमेंटच्या (एयूएम) एक टक्क्यांच्या आसपास आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमधील कंपनीची एकूण भागिदारी डिसेंबरच्या अखेरपर्यंत ३६ हजार कोटी रुपये होती,’ असं एलआयसीकडून सांगण्यात आलं आहे.

⚡⚡चष्मा आणि सनग्लास आता
बजाज फायनान्सवरती 0 डाऊन पेमेंट ,
0 % व्याज दरात उपलब्ध⚡⚡⚡
RAYBAN,STEPPER,VOUGE,
MAUI JIM SUNGLASS AVAILABLE

👓मोफत नेत्र तपासणी👓
👓चष्म्यासाठी मोफत इन्शुरन्स👓

आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago