ताज्याघडामोडी

पुण्यात पुर्ववैमन्यसातून दोन गटात तुफान राडा, बियरच्या बाटल्या फोडल्या, कोयते नाचवले

पुण्यात गेल्या काही दिवसांपासू कोयता गँगने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता आणखी एका गँगचा भयानक व्हिडिओ समोर आला आहे. पुर्ववैमन्यसातून येरवड्यात दोन टोळक्यांनी लक्ष्मीनगर परिसरात राडा घातला. या टोळक्याने तुफान दगडफेक करत बियरच्या बाटल्या घरावर आणि रस्त्यावर फेकल्या. एवढंच नाही तर हातात तलवारी आणि कोयते नाचवत दहशत निर्मा केली. या टोळक्याने एकाच्या डोक्यात कोयत्याने वार सुद्धा केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय.१९,रा.लक्ष्मीनगर, येरवडा) असे हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचं नाव आहे. त्यावरून पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर हत्येचा प्रयत्न करणे, बेकायदा हत्यारे बाळगणे, दहशत माजवणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल्ला खान याचा मोबाईल गहाळ झाल्याने मित्र महेश मिश्रा आणि आयुष यांना सोबत घेऊन ते शनिवारी रात्री येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. रात्री ११ च्या सुमारास तक्रार देऊन तिघे दुचाकीवरून घरी येत असताना गजराज हेल्थ क्लब समोरून त्यांच्या ओळखीचे काही मित्र त्यांचा दुचाकीवरून पाठलाग करू लागले.

त्यावेळी खान यांची दुचाकी घसरून ते तिघे खाली पडले. सर्व आरोपी अल्पवयीन मुलं त्यांच्याजवळ आले. त्यावेळी एका मुलाने “या कुत्र्याला आज सोडायचं नाही”, असं बोलून त्याच्या हातातील कोयत्याने जीवे मारण्याचा उद्देशाने खान याच्या डोक्यात दोन वेळा वार करून जखमी केले. त्यानंतर उर्वरित तीन अल्पवयीन मुलांनी खान याला लाकडी बांबूने जबर मारहाण केली. खान यांच्यासोबत असलेल्या महेश मिश्रा यांना देखील त्यातील एका मुलाने लाकडाने बेदम मारहाण केली. जीव वाचवून अब्दुल्ला खान जखमी अवस्थेत थेट येरवडा पोलीस ठाणे गाठले.

त्यानंतर आरोपी टोळक्यांनी हातात हत्यारे नाचवत परिसरात दहशत निर्माण केली. खान याला मारहाण केल्याचे समजताच दोन टोळक्यांनी एकमेकांवर आणि परिसरातील घरांवर, रस्त्यावर तुफान दगडफेक करून बियरच्या बाटल्या फोडल्या. यामुळे संतोष मित्र मंडळ आणि परिसरातील नागरिकांनी भयभीत होऊन घराचे दारं, खिडक्या बंद करून घेतल्या. रात्री १२ वाजता झोपण्याच्या वेळी हत्यारे नाचवणे, दगडफेक करणे आणि बाटल्या फोडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी सद्याच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी यांनी फुटबॉल खेळण्याच्या वादातून फिर्यादी अब्दुल्ला खान यांना मारहाण केल्याचं देखील तक्रारीत नमूद केलं आहे.

दरम्यान, टोळक्याने केलेल्या कोयत्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी सर्व गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून फरार मुलांचा शोध सुरु आहे. या राड्यात सर्व आरोपी मुलं अल्पवयीन आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago