उत्तर प्रदेशच्या कन्नोजमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा अपघातात शेवट झाला. बापलेकाच्या निधनाचं वृत्त समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला.
तिर्वामधील नथापुरवा गावचे रहिवासी अवधेश दुबे यांची मुलगी कोमलचा १५ फेब्रुवारीला विवाह आहे. घरात लग्न असल्यानं अवधेश यांचा मुलगा आदित्य (२६) घरी आला. आदित्य २८ जानेवारीला घरी परतला. तो बरेलीतील फर्निचरच्या कारखान्यात काम करतो. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अवधेश दुबे त्यांचा मुलगा आदित्यच्या सोबत लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघाले.
बापलेक बाईकवरून आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी जात असताना अपघात झाला. पाल चौकाजवळ असलेल्या बायपास येथून जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकनं धडक दिली. अपघातात अवधेश आणि आदित्य गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांनी हेल्मेट घातलेलं नाही. पितापुत्रांच्या निधनाबद्दल समजताच कुटुंबाला धक्का बसला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…