देशात गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना समोर येत असताना असाच एक भयंकर प्रकार दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात समोर आला आहे. इथे काही टवाळखोरांनी एका महिलेवर भर रस्त्यात गोळीबार केला. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पूर्ण करत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती असं या ३२ वर्षे तरुणीचे नावे आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारासरी ही घटना घडली. ज्योती आपल्या स्कुटीवरून घरी जात होत्या. त्यावेळी त्यांच्यावर गोळी झाडली. इतकंच नाहीतर त्याने महिलेची स्कुटीही चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळी बघायची गर्दी जमली होती. जमलेल्या काही लोकांनी ज्योती यांच्या जवळच्या लोकांना फोन केला आणि या घटनेबद्दल माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला निहाल विहारमध्ये पती आणि त्यांच्या तीन मुलांसह राहते. महिलेच्या घरी यामुळे मोठा धक्का बसला आहे. ज्योती या जगात नाहीयेत यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. अशा प्रकारे त्यांची हत्या का झाली याबद्दल मोठा वादंग निर्माण झाला आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमध्ये कुटुंबीयांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…