जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विद्यालंकार शेळेवाडी या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना येथे घडली असून या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनी सोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली असून यामुळे व्ही पी बांगडी असे या शिक्षकाचे नाव आहे. संबंधित मुलींनी आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित शिक्षकाची सातारा जिल्ह्यात बदली करण्यात घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिक्षण संस्थेकडून करण्यात आला आहे.
शिक्षक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देत त्यांना मोठे करायचे काम घडवत असतात. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य घडत असते मात्र असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
या शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाने नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत मुलींसोबत गैर कृत्य केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू असून याबाबत संबंधित पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतप्त झालेले पालकानी शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षकाने पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकार करू लागला.
यामुळे मुख्याध्यापकांनी तातडीने येथील गावच्या पोलीस पाटलांना बोलवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र यावेळी संबंधित शिक्षक हा शाळेत आलाच नाही. यामुळे गावकऱ्यांनी त्याची उचलबांगडी करण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधित शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी देत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरी संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
संबंधित शिक्षक हा शाळेतील नववी दहावीत शिकणाऱ्या वीस ते पंचवीस मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांच्या खांद्यावर हात टाकणं,खिशात हात घालत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली होती. आलेल्या तक्रारीनुसार त्वरित मुख्याध्यापकांना सदर शिक्षकाचे बदली करण्याचे आदेश दिले असून यापुढे संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करू, असे शेळेवाडीचे पोलीस पाटील श्रीपती पाटील यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…