दारूपिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने विळ्याने गळा चिरून आईचा खून केला. ही थरारक घटना रविवारी सायंकाळी यशोधरानगर पोलिस स्टेशन हद्दीतील वनदेवीनगर येथे उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी मुलाला अटक केली आहे. गोविंद संतराम काटेकर (वय २८) असे अटकेतील मुलाचे तर विमलाबाई संतराम काटेकर (वय ६०) असे मृतकाचे नाव आहे.
गोविंद याला दारूचे व्यसन असून, तो मिळेल ते काम करायचा. त्याच्या वडिलाचे निधन झाले असून, गोविंदचा मोठा भाऊ पत्नी व मुलासह कळमना भागात राहतो. गेल्या काही दिवसांपासून त्याला काम मिळत नव्हते. तो विमलाबाई यांना दारूपिण्यासाठी पैसे मागायचा. त्याची आई पैसे देण्यास नकार द्यायची. त्यामुळे तो विमलाबाई यांना मारहाण करायचा.
रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याने विमलाबाई यांना दारूसाठी पैसे मागितले. मी कसाबसा दोघांचा उदरनिर्वाह करते. माझ्याकडे पैसे नाहीत, असे विमलाबाई त्याला म्हणाल्या. त्याने विमलाबाई यांच्यासोबत वाद घातला. गोविंदने विळ्याने विमलाबाई यांचा गळा चिरला. त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गोविंदला अटक केली.
विमलाबाई यांचे सात खोल्याचे प्रशस्त घर आहे. विमलाबाई यांची हत्या केल्यानंतर गोविंद हा घराला कुलूप लावून बाहेर गेला. तो यशोधरानगर परिसरात फिरला. सायंकाळी त्याला पश्चाताप झाला. त्यानंतर तो थेट यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. मी माझ्या आईचा खून केला आहे, तिचा मृतदेह घरात आहे, असे त्याने यशोधरानगर पोलिसांना सांगितले. पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिस त्याला घेऊन वनदेवीनगरमध्ये गेले. पंचनामा करून विमलाबाई यांचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…