मागील महिन्यात अकोल्यात दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. त्यानंतर अनेक बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना घडल्या असून आता पुन्हा अकोल्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. तर बलात्कार करणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी गजाआड केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील मोठी उमरी भागात राहणारी एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीबरोबर रस्त्याने घरी जात असताना तिच्याच ओळखीतील एक २६ वर्षीय तरुण तिथे आला, अन् म्हणाला, “चल तुला घरी सोडून देतो.”, असं म्हणून तिला उमरीतील स्मशानभूमीच्या बॅक साईडला घेऊन गेला. अन् तिच्यावर जबरी संभोग केलाय. हा प्रकार गेल्या दहा दिवसांपूर्वी म्हणजेच १५ जानेवारीच्या रात्री घडला होता.
प्रकारानंतर आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या घरच्यांनाही ठार मारून टाकेन, असे तो म्हणाला. त्यामुळे अल्पवयीन मुलीने भीतीपोटी हा प्रकार कुठे सांगितला नाही. दरम्यान काही दिवसानंतर मुलीच्या अंगावर तसेच पाठीवर जखमा दिसून आल्या. यासंदर्भात तिच्या आजीने तिला विचारना केली अन् तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
त्यानंतर लागलीच कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीवर घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता आरोपी २६ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध ३७६, ३५४ सह बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तथा सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे करीत आहेत. तसेच अटक केलेल्या तरुणाला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस न्यायालयात त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत. दरम्यान अटकेत असलेला आरोपी हा विवाहित असून आकाश रामचवरे असे त्याचे नाव आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…