लग्न समारंभात वरातीमध्ये अनेक ठिकाणी नवऱ्या मुलाला 100, 500 किंवा 2000 च्या नोटांचा हार घातला जातो. मात्र पश्चिम दिल्लीच्या मायापुरी भागात एका लग्नाच्या वरातीत एक आश्चर्यकारक घटना घडली आहे.
एका अल्पवयीन चोरट्याने थेट नवऱ्या मुलाच्या गळ्यातील 500-500 च्या नोटांच्या हारावरच डल्ला मारला. यावेळी कोणाला काही समजण्या आगोदरच चोरट्याने या नोटांचा हार चोरून तेथून धूम ठोकली होती.
नातेवाईकांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पश्चिम दिल्ली पोलिसांना 25 जानेवारी रोजी एक चोरटा वराच्या गळ्यातील नोटांचा हार हिसकावून फरार झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास सुरु केला. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात त्यांना आरोपी दिसून आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांनी या आरोपीकडून 39,500 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तसेच उर्वरित रकमेबाबत चौकशी सुरू आहे.
चौकशीदरम्यान, आरोपी अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले की, तो वराच्या गळ्यातील नोटांचा हार हिसकावून पळून गेला, त्यात 500 च्या 329 नोटा होत्या. यातून पोलिसांनी 500 च्या 79 नोटा जप्त केल्या आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…