एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. बाप-लेकांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. पण या धक्कादायक प्रकरामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. वडील आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीत फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. वडील दीपक शिरोडे यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…