ताज्याघडामोडी

शिक्षकाने केले गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘आय लव्ह यू’ पाठवत होता असा मेसेज

पुण्यातल्या कोंढवा येथील एका शाळेत एका शारीरिक शिक्षणाच्या (पीटी) शिक्षकाने गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनाच्या दरम्यान चार विद्यार्थीनींनी हा प्रकार सांगितल्या नंतर ही धक्कादायक बाब उघड झाली. हा शिक्षक विद्यार्थीनींना मिठ्या मारत असे. तसेच तो त्याचे चुंबन घेऊन त्यांचा विनयभंग करत होता. इतक्यावर न थांबता हा शिक्षक विद्यार्थिनींना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘आय लव्ह यू’ असा मेसेजही पाठवत होता. हा धक्कादायक प्रकार शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शाळेच्या वतीनेच या शिक्षकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अविनाश गोविंद चिलवेरी ( वय २३, रा.बिडी कामगार वसाहत, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्यावतीने एका ३७ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर याप्रकरणी चिलेवार याच्या विरुध्द पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यामध्ये एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आरोपी तेथे सात ते आठ महिन्यांपूर्वीच पी.टी. शिक्षक म्हणून रुजू झाला होता. तो मागील दोन महिण्यांपासून तेथील विद्यार्थीनींना जबरदस्ती मिठी मारुन चुंबन घेत असे. तसेच त्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आय लव्ह यू असा मेसेजही पाठवत होता. हा प्रकार नोव्हेंबर पासून सुरू होता.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago