औरंगाबाद : शहरातील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर औरंगाबदमध्ये उपचार सुरू आहेत. भागवत पंजाजी काळे (वय-३४) असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत काळे हे शहरातील एका कंपनीत काम करतात. बाहेर फिरायला जातो, असं सांगून ते घरातून निघाले. मात्र नंतर ते दोन्ही मुलांना घेऊन अंबड रस्त्यावर आले आणि तिथे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजलं. भक्ती आणि वेद अशी उपचार सुरू असलेल्या जुळ्या चिमुकल्यांची नावे आहेत.या प्रकरणी नातेवाईक आणि पोलिसाकडूनच मिळालेली अधिक माहिती अशी की, काळे हे सुमारे दहा वर्षांपासून वाळूज औद्योगिक नगरीतील रांजणगाव भागात रोजगार निमित्ताने राहत होते. दोन्ही मुलांना घेऊन फिरून येतो असे सांगून ते घराबाहेर गेले. बऱ्याच वेळानंतर काळे यांनी त्यांच्या मावस भावाला कॉल करून जालना-अंबड रस्त्यावर दोन्ही मुलांना विष पाजून मी स्वतः विष प्राशन केल्याची माहिती दिली.
भागवत काळे यांच्या मावस भावाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन काळे व दोन्ही मुलांना जालना येथे रुग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचार करून तिघांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काळे यांचं मृत्यू झाला तर दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहे.
जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र भागवत काळे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…