चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूरमध्ये असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात मोठा तलाव आहे. या तलावात बुडून 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तलावात बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले आहेत. ही कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात झाली आहे. काल (दि.26) रोजी ही घटना घडली आहे. रात्री उशीरा मुले का आली नाही याचा शोध घेतला असता ते तलावात बुडाल्याचे निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावात बुडून 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. आज (दि.27) मागच्या काही तासांपूर्वी शोधमोहीम सुरू असताना या तिन मुलांचे मृतदेह तलावाच्या काठी आढळले. कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात ही मुले राहतात.
या तिन्ही मुलांचे वय दहा वर्षाचे असून एकाच वर्गात शिकत होती. काल सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली. मात्र रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. दरम्यान शोधाशोध सुरू असताना रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मुलांचे कपडे आणि तीन जोड कपडे आढळले होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…