ताज्याघडामोडी

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील वादातून गोळीबार

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या गोळीबाराने या परिसरात खळबळ उडाली होती. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात वर्गणी कोण जास्त देणार, यावरुन व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील वादावादीतून गोळीबार झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून त्यात गोळीबार करणार्‍या व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत संतोष सेवू पवार (वय ३५, रा. बावधन) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश बद्रिनाथ राठोड आणि देवा ऊर्फ देविदास सोमनाथ राठोड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच देवा राठोड याला अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हा पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये रोहिदास चोरगे याच्याविरुद्ध फिर्यादी संतोष पवार यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. भविष्यात फिर्यादीला त्रास होऊ नये, याकरीता रमेश राठोड (गोळी लागलेला जखमी आरोपी) याला फिर्यादी संतोष पवार यांनी मध्यस्थी करण्यास सांगितलं होतं. त्यात राठोड याने मध्यस्थी केल्यामुळे जुलै २०१५ पासून आजपर्यंत वेळोवेळी भेटून पैशांची मागणी केली. मात्र तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५ ते ६ लाख रुपये रोखीने वसूल केले आहे.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago