ताज्याघडामोडी

28 वर्षाच्या सुनेवर 70 वर्षाच्या सासऱ्याचा जडला जीव, लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

गोरखपूरमध्ये झालेल्या एका लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या या फोटोची चर्चा सर्वत्र भलतीच रंगली आहे. गोरखपूर येथील बडहलगंज कोतवाली क्षेत्रातील छपिया उमराव गावात राहणारे कैलास यादव (70) आणि त्यांची सून पूजा (28) या दोघांनी मंदिरात जाऊन विवाह केला.

वयोवृद्ध सासऱ्यासोबत सूनेने विवाह केल्याची गावात सर्वत्र चर्चा रंगली असतानाच त्यांच्या लग्नाचे व्हायरल झालेल्या फोटोमुळे सून-सासऱ्याच्या लग्नाला चांगलीच प्रसिद्धि मिळाली.

कैलास यादव बडहलगंज पोलीस ठाण्यात चौकीदार आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू 12 वर्षांपूर्वी झाला होता. कैलास यांना चार मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या सूनेचे दुसरे लग्न लावून दिले, मात्र तिथून ती पुन्हा तिच्या सासरी कैलास यादव यांच्या घरी राहू लागली. यादरम्यान सासऱ्यासोबत सूनेचे सूत जुळले आणि दोघांनीही मंदिरात जाऊन विवाह सोहळा पार पाडला.

घटनेबाबत पोलीस अधिकारी जे. एन. शुक्ला यांनी दिलेली माहिती अशी की, कैलास आणि त्यांचा मुलगा पोलीस ठाण्यात पहारेकरी आणि फॉलोअरचे काम करतात. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या सून आणि सासऱ्याच्या लग्नाविषयी कैलास आणि त्यांच्या कुटुंबियांना विचारले असता, त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. आजूबाजूच्या गावातील लोकं आणि शेजाऱ्यांचे हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, असे म्हणणे असून या घटनेबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago