मध्य प्रदेशातील विदिशा येथे भाजपचे नगरसेवक संजीव मिश्रा यांनी दोन मुले आणि पत्नीसह विष प्राशन करून आत्महत्या केली. मुलांचा जागीच मृत्यू झाला तर पती-पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.आत्महत्येच्या काही वेळापूर्वी संजीवने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यात त्यांनी लिहिले की, ‘देव हा आजार, मस्कुलर डिस्ट्रॉफी डीएमडी, अगदी शत्रूच्या मुलांनाही देऊ नये’.
पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांना या आजाराची माहिती मिळाली. यानंतर सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास त्यांचा एक ओळखीचा व्यक्ती घरात गेला असता दरवाजा बाहेरून बंद होता. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत पाहिले असता चौघेही बेशुद्ध अवस्थेत पडले होते. तत्काळ चौघांनाही रुग्णालयात नेण्यात आले मात्र चौघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी रुग्णालयात पोहोचले. जिल्हाधिकारी उमाशंकर भार्गव यांनी संजीव मिश्रा मुलांना मस्क्यूलर डिस्ट्रॉफी नावाचा अनुवांशिक आजार असल्याचे सांगितले. यावर कोणताही इलाज नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. मस्कुलर डिस्ट्रॉफी हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची शक्ती कमकुवत होते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे ते आकुंचित होऊ लागतात.
सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, संजीव एम्समधील डॉक्टरांचा सल्ला घेत असे. या आजारामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…