ताज्याघडामोडी

आई-वडील कामावर गेल्यानंतर भयंकर घटना; ३ वर्षीय मुलगी घरातून गायब, नंतर आढळला मृतदेह

भिवंडीमध्ये तीन वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एका तीन वर्षांच्या मुलीच्या हत्येने भिवंडी हादरली. हत्येचा हा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला असून या मुलीचा मृतदेह येथील चाळीतील पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये मिळाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची विविध पथके आरोपीचा शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

हत्या झालेल्या ही अल्पवयीन मुलगी तीन भावंडांमध्ये सर्वांत लहान होती. मंगळवारी सकाळी तिचे आई-वडील कामावर गेले होते. दुपारी १ वाजता आई घरी आल्यानंतर लहान मुलगी कुठे दिसली नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्याने अखेर रात्री तिच्या पालकांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करत मुलीचा शोध सुरू केला. पहाट झाली तरी मुलीचा शोध सुरू होता.

बुधवारी सकाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाळीतील पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये या मुलीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवला असून तिच्या हत्येप्रकरणी अपहरण, हत्या, पोस्को आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीचा शोध लागलेला नसल्याने या मुलीची हत्या नेमकी कोणी केली याचा उलगडा झालेला नाही. पोलिसांची विविध पथके आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

तीनच दिवसांपूर्वी भिवंडीमध्ये तीन वर्षांच्या मुलीचे अगोदर अपहरण करण्यात आले. नंतर तिची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी भिवंडीमध्ये आणखी एका तीन वर्षांच्या मुलीच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

9 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago