चांदवड तालुक्यातील निमोण येथील ५ वर्षीय सेजल सोमनाथ जाधव ही सकाळी घरा जवळ खेळत असताना झाडाझुडुपांमधून आलेल्या हिंस्त्र प्राण्यांने सेजलला शेतात नेत ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे , या घटनेने संपूर्ण निमोण सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील निमोण शिवारात सोमनाथ जाधव हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. बुधवारी (दिनांक २५ जानेवारी) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची ५ वर्षांची मुलगी सेजल ही घराबाहेर खेळत होती. इतक्यात तिच्या मागच्या बाजूने एक हिस्त्र प्राणी आला. या हिंस्त्र प्राण्यांने तिला उचलून जवळच्या कांद्याच्या शेतात नेले.
यावेळी या प्राण्याने लगानग्या शेजलच्या शरीराचे लचके तोडल्याने चिमुकल्या सेजलचा जीव गेला. थोड्या वेळाने सेजल अंगणात कुठे दिसत नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनीं तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच आढळली नाही. त्यानंतर त्यांनी तिचा आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. त्यावेळी त्याला जे दृश्य दिसले ते अतिशय धक्कादायक होतं.सेजलच्या कुटुंबीयांना आपली मुलगी शेजल ही सेजल कांद्याच्या शेतात मृत अवस्थेत दिसून आली. तिच्या शरीराचे लचके तोडण्यात आल्याचे दिसत होते. या वेळी हे धक्कादायक दृश्य पाहून सेजलच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…