ताज्याघडामोडी

वाढदिवस ठरला मृत्यू दिवस; केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत घडली भयंकर घटना

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.फुलंब्री तालुक्यातील जातेगावमधील ही घटना आहे. विकास शेजवळ असं मृत तरुणाचं नाव आहे. विकास याचा वाढदिवस होता. वाढदिवसाला केक आणण्यासाठी तो आपले भाऊजी सुरेश भालेराव यांच्यासोबत फुलंब्रीला गेला होता.

मात्र घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र यातील विकास शेजवळ याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ऐन वाढदिवसांच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. केक आणताना अपघात घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विकास शेजवळ हा फुलंब्री तालुक्यातील जातेगावमधील रहिवासी आहे.

त्याचा वाढदिवस असल्यानं तो त्याचे भाऊजी सुरेश भालेराव यांच्यासोबत केक आणण्यासाठी फुलंब्रीला गेला होता. मात्र केक घेऊन घरी परतत असताना फुलंब्री , राजुर रोडवरील ज्ञानसागर विद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या हायवाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची घटना लक्षात येताच स्थानिकांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील विकास शेजवळ याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago