ताज्याघडामोडी

येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता…

कायदे कितीही कठोर केले तरी महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. राज्यात दररोज कुठे ना कुठे स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिसेंच्या घटना घडत असतात.नाही मिळालं, तर ओरबाडा, ओरबाडता नाही आलं तर संपवून टाका ही मानसिकताच या घटनांना कारणीभूत ठरतेय. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेने नांदेड हादरलंय. 

तरुणाकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगांव इथली ही संतापजनक घटना आहे. 20 वर्षीय ऋतुजा शिंदे असे मयत तरुणीचे नाव आहे. गावातील आरोपी उद्धव शिंदे हा तिची नेहमी छेडछाड काढत होता. येता-जाता ऋजुता पाहून अश्लिल शेरेबाजी आणि हावभाव करत होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला ऋजुता कंटाळली होती. याबबात तीने आपल्या कुटुंबाला माहिती दिली होती. त्यांनी आरोपीच्या आई-वडिलांनी ही गोष्ट सांगत समज देण्याचं सांगितलं.

छेड काढणारा आरोपी आणि मयत तरुणी एकाच गावातील आहेत. आरोपी छेडछाड करण्यासोबतच अश्लील कॉमेंट करत होता. आरोपी सतत त्रास देत असल्याने मुलीने आपल्या आईवडिलांना ही बाब सांगितली. गावातील मामला असल्याने आईवडिलांनी आरोपीच्या आईवडीलांना सांगितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट आरोपी उद्धव शिंदे तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने ऋजुताला जास्तच त्रास द्यायला सुरुवात केली. गावात याची सगळीकडे वाच्यता झाल्याने ऋजुताने अखेर स्वतःच जीवन संपवलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago