ताज्याघडामोडी

भररस्त्यात चाकूने वार, महिला मदतीसाठी ओरडत राहिली पण…

तामिळनाडूमधील वेल्लोर येथे पतीने भररस्त्यात पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेरियावरिगम परिसरात ही घटना घडली आहे.सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं नाव पुनीता असून ती एका बुटाच्या कारखान्यात काम करत होती. सोमवारी संध्याकाळी ती कामावरुन घरी परतत होती. त्याचवेळी तिचा पती जयशंकर याने तिला रोखलं. त्याने पुनीतासह भांडण सुरु केलं. दोघेही यावेळी रस्त्यावर उभे होते. पुनीता तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण जयशंकर वारंवार तिला रोखत होता. 

यानंतर त्याने खिशातून चाकू काढला आणि सातवेळा पुनीतावर वार केले. भररस्त्यात हा सगळा प्रकार घडल्याने पादचाऱ्यांनाही धक्का बसला. पण एकानेही पुढे येऊन जयशंकरला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचवेळी मागून एक महिला आली आणि तिने जयशंकरला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. महिलेने अडवण्याचा प्रयत्न केला असता जयशंकरने तेथून पळ काढला. 

हल्ल्यात पुनीता गंभीर जखमी झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात ती खाली पडलेली होती. यानंतर महिलेने तात्काळ पोलिसांना फोन केला. पुनीताला रुग्णालयात नेण्यात आलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago