नेरी (ता. जामनेर) गावातील तरुणाने स्वत:लाच व्हॉट्सअॅप स्टेटसवर श्रद्धांजली वाहत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली.सदर घटना रविवारी दुपारी घडली. ऋषिकेश दिलीप खोडपे उर्फ गोलू (वय २५) असं या मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
नेरी बु. (ता.जामनेर) येथे ऋषीकेश हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास ऋषीकेशने व्हॉट्सअॅप स्टेटसवर मूड ऑफ असे स्टेटस ठेवले. शनिवारी रात्री गावातील सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमात ऋषिकेश याने सहभाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले. त्यानंतर त्याने चुलत भाऊ प्रदीप खोडपे यास फोन करत मी तुला सोडून जात आहे.. असे सांगितले.
ऋषिकेश याने सांगितल्यानुसार प्रदीप हा त्या ठिकाणी पोहचला. यावेळी ऋषिकेश हा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी ऋषिकेश यास खाली उतरवून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…