ताज्याघडामोडी

दोन-पाच सभेनंतर जीवाला धोका, काळ्या मांजराला भिती; गजानन काळे यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत गळाभेट घेतली. या भेटीवरूनही गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, राहुल गांधी यांना भेटण्यापेक्षा एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांना विश्व प्रवक्ते संजय राऊत यांना भेटण्याची गरज आहे. तर सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना गजानन काळे म्हणाले की, पक्ष बुडाला तरी रोज सकाळी उठून संजय राऊत यांची विधाने सुरूच आहे. त्यात आता एक नवीन मांजर आली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांचा उल्लेख काळी मांजर असा करत पुढे ते म्हणाले, दोन-चार सभा घेतल्यानंतर सुषमा अंधारे म्हणतायंत माझ्या जीवाला धोका आहे. पूर्वी म्हणत होत्या आपल्याला कोण हात लावतंय, काही वर्षांपूर्वी सुषमा अंधारे या काँग्रेस नेत्यांच्या बाजूला होत्या तिथे पत्रकार परिषद, त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंचावर पत्रकार परिषद घेतल्या. सगळीकडे डाळ नाही शिजली तर आता शिल्लक सेनेत.. (उद्धव ठाकरे गट), यासह त्यांनी सुषमा अंधारे यांना फिरता चषक असल्याचे म्हणत खोचक टोलाही लगावला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago