ताज्याघडामोडी

पाळीव कुत्र्याला कुत्रा का म्हणाला यावरुन शेजाऱ्याच्या छातीत चाकू भोसकून खून

शेजाऱ्याच्या दारी आलेल्या कुत्र्याला कुत्रा का म्हटले, यावरुन दोन शेजाऱ्यात प्रचंड हाणामारी झाली. या हाणामारीत शेजाऱ्याने 65 वर्षीय शेजाऱ्याच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना दिंडीगुल येथे शुक्रवारी घडली. रायप्पन असे खून झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. तर डॅनियल असे मारेकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

शेजारी राहणारे डॅनियल आणि रायप्पन हे एकमेकांचे नातेवाईकही होते. मात्र शेजाऱ्यांनी पाळलेला कुत्रा रायप्पनवर नेहमी भुंकत होता. त्यामुळे रायप्पन परेशान होता. शुक्रवारीही डॅनियलच्या भावाने पाळलेला कुत्रा पायरप्पनवर भुंकला होता. त्यातू त्यांचे भांडण झाले होते. 

रायप्पन आपल्या नातवासोबत घराबाहेर फिरत होता. यावेळी डॅनियलचा भाऊ व्हिन्सेंटने पाळलेला कुत्रा रायप्पनच्या दिशेने शुक्रवारी भुंकत आला होता. त्यामुळे रायप्पनने आपल्या नातवाला काठी आणण्यास सांगितले. त्यानंतर रायप्पनने त्या कुत्र्याला गो डॉग गो असे म्हटले. त्यावरुन डॅनियलला मोठा राग आला. आम्ही आमच्या कुत्र्याचे चांगले भरण पोषण करतो. मात्र तू त्याला कुत्रा का म्हणाला, यावरुन डॅनियलने रायप्पनशी वाद सुरू केला. 

घराबाहेर फिरताना रायप्पनने डॅनियलच्या कुत्र्याला कुत्रा म्हटल्यावरुन डॅनियलने रायप्पनशी वाद सुरू केला. यावेळी डॅनियलचा भाऊ व्हिन्सेंट हा देखील या वादात सहभागी झाला. त्यांनी रायप्पनला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी डॅनियलने आणलेला चाकू रायप्पनच्या छातीत चाकूने भोसकले. त्यामुळे रायप्पन जागीच खाली कोसळला. त्यानंतर काही वेळात त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago