उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक संतापजक घटना समोर आली आहे. येथे धावत्या रेल्वेत एका ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.धक्कादायक बाब, रेल्वेतील टीसीनेच आपल्या मित्रांसोबत मिळून हे संतापजक कृत्य केलं. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी टीसीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे.
राजू सिंह असं अटक करण्यात आलेल्या टीसीचं नाव आहे. सामूहिक अत्याचाराची ही खळबळजनक घटना चंदौसी रेल्वेस्थानकादरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला १६ जानेवारीला सुभेदारगंज, प्रयागराज येथे जाण्यासाठी आली होती. यावेळी महिलेकडे जनरल डब्याचं तिकीट होतं.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, स्टेशनवर उपस्थित असलेल्या टीसी राजू सिंहने पीडित महिलेला तुमचा लांबचा प्रवास आहे. मी तुम्हाला एसी कोचमध्ये जागा देतो, असं म्हणत एसी कोचमध्ये बसवलं. यानंतर रात्री तो पीडित महिलेला जेवणाची विचारणा करण्यासाठी आला. मात्र, जेवण करण्यास पीडितेने नकार दिला.
यानंतर टीसीने पीडित महिलेला शीतपेय पिण्यासाठी दिलं. ते पिताच महिला बेशुद्ध झाली. ट्रेनमध्ये सर्व झोपी गेल्याचा फायदा घेत टीसीने महिलेचे कपडे उतरवले आणि तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता त्याने आपल्या मित्रांनाही महिलेवर बलात्कार करायला लावला. यादरम्यान, आरोपींनी महिलेचे नग्न व्हिडीओ देखील बनवले.
जेव्हा टीसीसह त्याचे मित्र महिलेवर अत्याचार करत होते, तेव्हा महिलेला थोडीफार शुद्ध होती. मात्र, आपल्याला काहीच करता येत नसल्याचं पीडित महिलेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेच्या पाच दिवसानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.तक्रार दाखल होताच, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी टीसीसह एकाला अटक केली आहे.
सध्या एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे रेल्वेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, रक्षकच भक्षक बनल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.संभल जिल्ह्यात पंधरवड्यात रेल्वेत बलात्कार आणि विनयभंगाची ही दुसरी घटना आहे. ही बाब लक्षात येताच रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत आरोपी टीटीईला निलंबितही केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…