गुजरातच्या अहमदाबादमध्ये घरगुती हिंसाचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहेय. या घटनेत पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झाला आहे.शुक्रवारी एका फ्लॅटला आग लागल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. आग विझवताना जखमी पत्नीला बाहेर काढण्यात आले. त्यावेळई पत्नीच्या अंगावर अनेक जखमा आढळल्याने वेगळीच शंका निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.
अहमदाबादच्या गोदरेज गार्डन सिटीमध्ये एक महिला तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली, तर तिचा पती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. फ्लॅटला आग लागून महिलेचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला एक तास लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळी 8 वाजता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना फ्लॅट क्रमांक 405, गोदरेज गार्डन सिटी येथे आग लागल्याचा फोन आला. जेव्हा अग्निशमन विभागाचे कर्मचारी तिथे पोहोचले तेव्हा अनिल बघेल आणि अनिता बघेल नावाचे जोडपे तळमजल्यावर जखमी अवस्थेत आढळून आले. दोघांवरही चाकूने वार केल्याचे दिसत होते. वैद्यकीय पथकातील अधिकाऱ्यांनी अनिताला मृत घोषित केले आणि अनिलला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले, असे अग्निशमन अधिकारी मिथुन मिस्त्री यांनी सांगितले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…