आईनेच प्रियकराच्या मदतीनं पोटच्या पोराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. मुलानं आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. अनैतिक संबंध लपवण्यासाठी महिलेनं प्रियकराच्या मदतीनं स्वत:च्या मुलाची हत्या केली.
दहा वर्षांचा वरुण खेळता खेळता बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे मामा उमेश कुमार यांनी १६ जानेवारीला नोंदवली. त्यांनी या प्रकरणी चांदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढच्याच दिवशी, १७ जानेवारीच्या संध्याकाळी पाच वाजता वरुणचा मृतदेह गावाजवळ असलेल्या जंगलात सापडला. वरुणची हत्या गळा आवळून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. वरुणची आई मुन्नी आणि तिचा प्रियकर टिंकू चुन्नी यांना पोलिसांनी अटक केली.
दोन आरोपींचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. १६ जानेवारीला मुन्नीचा पती बाहेर गेला होता. हीच संधी साधून टिंकू मुन्नीच्या घरी टिंकू मुन्नीच्या घरी गेला. त्यावेळी बाहेर खेळत असलेला वरुण अचानक घरी पोहोचला. त्यानं आईला टिंकूसोबत पाहिलं. टिंकू वरुणचा काका लागतो. वरुणनं पाहिल्यानं आपलं पितळ उघडं पडेल अशी भीती मुन्नी आणि टिंकूला होती. त्यामुळे दोघांनी वरुणची गळा आवळून हत्या केली.
जवळपास तीन तास वरुणचा मृतदेह घरातच होता. रात्र झाल्यानंतर आरोपी टिंकूनं वरुणचा मृतदेह जंगलात नेऊन टाकला. वरुणनं आईला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. मी पप्पांना सांगणार असं त्यावेळी वरुण बोलून गेला. हे ऐकताच आई आणि टिंकूनं त्याची गळा आवळून हत्या केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मुन्नीनं आसपासच्या घरांमध्ये जाऊन वरुणबद्दल विचारणा केली. मात्र पोलीस चौकशीत गुन्हा उघडकीस आला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…