ताज्याघडामोडी

उपचारादरम्यान तरुणीचा गर्भपात झाला, मग डॉक्टर दाम्पत्याने जे केले ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल !

बिहारमधील हाजीपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बोगस डॉक्टर दाम्पत्याकडे उपचारासाठी आलेल्या तरुणीचा गर्भपात झाला. यादरम्यान तरुणीची तब्येत बिघडल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी भृण कुत्र्यांना खायला घातला. यावेळी तरुणीचाही मृत्यू झाला.

तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता ही खळबळजनक बाब उघडकीस आली. पोलीस तपासात सदर नर्सिंग होम देखील बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे. तसेच या डॉक्टर दाम्पत्याकडे एमबीबीएसची डिग्री नसल्याचेही उघडकीस आले आहे. घटनेनंतर आरोपी डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहेत. पोलीस फरार दाम्पत्याचा शोध घेत आहेत.

वैशाली जिल्ह्यातील बलिगाव पोलीस ठाण्याअंतर्गत चंपापूर अग्रैल गावात घडली आहे. मयत तरुणी तीन महिन्यांची गरोदर होती. तिच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईक तिला घेऊन सदर नर्सिंग होममध्ये घेऊन गेले.

तरुणीच्या नातेवाईकांना हे नर्सिंग होम बेकायदेशीर असल्याची माहिती नव्हती. डॉक्टरांनी तरुणीवर उपचार सुरु केले, मात्र तिचा गर्भपात झाला आणि तिची तब्येत बिघडू लागली. यामुळे डॉक्टर दाम्पत्य घाबरले.

पोलीस केस होईल या भीतीने या डॉक्टर दाम्पत्याने गर्भपातानंतर भृण आपल्या पाळीव कुत्र्याला खायला घातले. तरुणीची तब्येत अधिक बिघडल्याने नातेवाईक तिला महुआ रुग्णालयात घेऊन गेले. तेथून तिला पटना येथे रेफर करण्यात आले.

पटना येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी सदर डॉक्टर दाम्पत्याच्या निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच फरार डॉक्टर दाम्पत्याचाही शोध घेत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

15 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago