कोणताही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगली शिकवण देतो, त्याला चांगल्या वाईटाची समज देतो, आयुष्यातील योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच आई-वडील आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शाळेत शिकण्यासाठी पाठवतात.
मात्र, एका महिला शिक्षिकेने असं काही केलं, की ज्यामुळे १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी आपल्या आयुष्यातील योग्य मार्गच विसरला आहे. चांगले वाईट यामधील फरक विसरला आहे.
उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोयडा शहरातील एक महिला शिक्षिका एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन पळून गेली आहे. आता मुलाच्या वडिलांनी या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली आहे. सध्या दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच दोघेही सापडतील असं पोलिसांनी सांगितलं आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शिक्षिका आपल्यापेक्षा ६ वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती त्याला घेऊन पळून गेली. मुलगा वेळेवर घरी न पोहचल्याने कुटुंबीय काळजीत पडले. कुटुंबीयांनी मुलाचा खूप शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही.
महिला शिक्षिकेच्या पतीने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली. आता पोलीस शिक्षका आणि विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगा सहा महिन्यांपूर्वी या महिला शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होता. इथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्यूशन शिकवणाऱ्या शिक्षिकेचे वय २२ वर्षे असून मुलाचे वय १६ वर्ष आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…