ताज्याघडामोडी

शिक्षकाने वर्गात चिडवल्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या, संतापलेल्या आईने पोलिस स्टेशनमध्ये

“कॉपीड गर्ल” म्हणून वर्गात शिक्षकाने चिडवल्याने नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली असल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे.

ही घटना लातूर शहरात घडल्यापासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचबरोबर मुलीच्या आईने या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

श्रावणी नाईकनवरे ही विद्यार्थीनी नववीच्या वर्गात शिकत होती. तिच्या शाळेचं नाव किड्स इन्फोपार्क असं आहे. त्या शाळेतील शिक्षक राहुल पवार यांनी कॉपीड गर्ल असं म्हणून वर्गात चिडवल्याने श्रावणीची मानसिकता खचली होती. त्याच मानसिकतेतून श्रावणीने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. या प्रकरणाची शिवाजीनगर पोलीस कसून चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मागच्या चार दिवसात लातूर जिल्ह्यात दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. मागच्या तीन दिवसापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या साक्षी गायकवाड या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली होती. तिची प्रथम सत्राची परीक्षा दोन दिवसावर होती .तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago