ताज्याघडामोडी

आमच्या ग्रामपंचायती विषयी का बोलतो, सरपंच माजी पंचायत समिती सदस्यामध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

तू आमच्या ग्रामपंचायतीविषयी का बोलत आहेस, असे विचारून दम दिल्यानंतर झालेल्या वादानंतर सरपंच आणि माजी पंचायत समिती सदस्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. पंचायत समितीच्या कार्यालयामध्येच ही हाणामारी झाली आहे. ही घटना परभणीच्या जिंतूर पंचायत समितीमध्ये घडली आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान या प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांमध्ये नोंद करण्यात आलेली नाही.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम येथील पंचायत समितीचे माजी सदस्य केशव घुले हे जिंतूर पंचायत समितीमध्ये आले. ते विस्तार अधिकाऱ्यांना विहिरीचे मस्टर न काढता रस्त्याचे मस्टर का काढले याविषयी जाब विचारत होते. हा प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी धमधम गावचे सरपंच वाल्मीक ठाकरे त्या ठिकाणी आले. तू आमच्या ग्रामपंचायती विषयी का बोलत आहेस, असे म्हणून त्यांनी माजी पंचायत समिती सदस्य केशव घुले यांच्यासोबत वाद घातला आणि घुले यांना दम दिला.

यावेळी बाचाबाची सुरू असताना पंचायत समितीची माजी सदस्य केशव घुले आणि सरपंच वाल्मीक ठाकरे हे एकमेकांना भिडले दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची आणि फ्रीस्टाइल हाणामारी झाली. यावेळी पंचायत समितीमध्ये उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवल्याने पुढील अनुचित प्रकार टळला आहे. धमधम येथे झालेल्या कामांमध्ये गैरप्रकार झाला असून त्या कामाची चौकशी सुरू असल्याने दोघांमध्ये वाद झाला असल्याची चर्चा ऐकयला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago