ताज्याघडामोडी

जिममध्ये ओळख झाली, प्रेम झालं, लग्नही केलं, काही दिवसांतच नवरा आधीच विवाहित असल्याचं समजलं

अलिकडे शहरात तरुणींचे विश्वास संपादन करुन त्यांच्यावर बलात्काराच्या घटनांचा आलेख झपाट्याने वाढत असून अशीच एक घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडली.

जीममध्ये कसरत करण्यासाठी येत असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमीष दाखवून इथल्या जिम ट्रेनरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. युवतीच्या तक्रारीवरुन हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रविकांत अशोक धार्मिक (वय 34, केडीके कॉलेज रोड, नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे. रविकांत हा जिम ट्रेनर आहे. 29 वर्षीय युवती त्याच्या जिममध्ये कसरत करण्यासाठी येत होती. दरम्यान, दोघांमध्ये मैत्री झाली. युवतीच्या तक्रारीनुसार रविकांतने सुरुवातीला तिला आपण अविवाहित असल्याचे सांगितले. दोघांमध्ये गाठीभेटी होऊ लागल्या. त्यानंतर आरोपी रविकांतने लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

युवतीने दबाव टाकल्यानंतर त्याने सीताबर्डीत एका मंडळात तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तो पतीप्रमाणे तिच्यासोबत राहू लागला. मात्र, काही दिवसांतच रविकांत विवाहित असून, त्याला एक मुलगा असल्याची माहिती युवतीला कळली. याबाबत विचारणा केली असता रविकांतने युवतीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

2 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

6 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago