ताज्याघडामोडी

मोठ्या भावाच्या आधी धाकट्याचा विवाह; समाजाच्या भीतीने थोरल्याने लहान भावाचा जीव घेतला

धाकट्याने आपल्यापूर्वीच प्रेमविवाह केल्याने सामाजिक बदनामी झाल्याची भावना मनात आली आणि त्यातूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. तो विकोपाला गेला त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन थोरल्याने धाकट्या भावाचा धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काजना येथे घडली. सुधीर चरणदास घरडे (२५, रा. काजना) असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सतीश उर्फ सचिन चरणदास घरडे (२७, रा. काजना) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार सुधीरने काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला. थोरला भाऊ सचिनला ते पटले नाही. त्यावरून सचिन हा धाकटा भाऊ सुधीरसोबत नेहमी वाद घालत असायचा. याच कारणावरून दोघा भावांमध्ये घरासमोरच वाद झाला. या वादात सचिनने सुधीरवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. सुधीर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.

त्यानंतर सचिन घटना स्थळावरून पसार झाला. हा प्रकार सुधीरची पत्नी कशीश (१९) हिच्या ध्यानात आल्यावर त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने सुधीरला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सुधीर यांना मृत घोषित केले. त्याच्या पोटात दोन वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून आरोपीच्या शोधात पोलिसांनी दोन पथक रवाना केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago