डोंबीवली पूर्वेकडील मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्यावर दोन विद्यार्थ्यांनी मैत्रणीच्या वादातून हल्ला केल्याचे समोर आले आहे. डोंबिवली पूर्व भागातील गांधीनगर परिसरातील इमारतीमध्ये हा विद्यार्थी कुटूंबासह राहत असून तो डोंबीवली पूर्वेकडील मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर हल्लेखोर दोन्ही विद्यार्थी देखील याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली आहे. हे दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे ही घटना मंजुनाथ महाविद्यालयाच्या समोरच घडली असल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे महाविद्यालयीन प्रशासनाकडे अशा घटना होऊ नयेत याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थ्याची गेल्या काही दिवसांपूर्वी महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीशी मैत्री झाली. यामुळे हल्लेखोर विद्यार्थ्यांनी त्याच्याशी वाद घातला. मात्र, तरी देखील तो त्या तरुणीशी गप्पा मारत असल्याचं हल्लेखोरांना दिसून आलं. त्यातच १७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हल्लेखोर विद्यार्थ्यांनी त्याला महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश दारावर गाठले आणि महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश दारा समोरच त्याला धमकी दिली. ‘उससे दूर रहा कर, नही तो हम तुझे छोडेंगे नही’, अशी धमकी देऊन त्याला शिवीगाळ केली. यामुळे पुन्हा वाद होऊन, दोघा हल्लेखोर विद्यार्थ्यांनी लाथाबुक्याने हल्ला करत त्याचा एक दात तोडला. शिवाय डोळ्यावर बुक्की मारून त्याच्या डोळ्याला गंभीर इजा केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…