वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि उपक्रमात हिरीरीने सहभागी होणारे हिरामन पंढरीनाथ देवरे यांचं निधन झालं होतं, पतीच्या निधनाची बातमी ऐकताच पत्नीला देखील हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचेही निधन झाले आहे.
तासाभराच्या अंतरावरच पती पत्नीचे निधन झाल्याची बाब संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हिरामन देवरे यांच्यावर आठ दिवसांपासून नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच दरम्यान रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते, हीच बाब त्यांच्या गावी म्हणजेच उमराणे येथे कळली, काही वेळेतच ही बाब त्यांची पत्नी विमलबाई देवरे यांना समजली, आणि त्यांना पतीच्या निधनाचा धक्का बसला. पतीच्या निधनाने अश्रु अनावर होत असतांना त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचाही मृत्यू झाला. पती-पत्नीचा तासाभरातच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण उमराणे गावावर शोककळा पसरली आहे.
पती-पत्नी मधील असलेलं प्रेम पाहून उमराणे गावातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. देवरे कुटुंबातील ही दुख:द घटना संपूर्ण गावात पसरली त्यावेळी प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…