ताज्याघडामोडी

इसबावीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याकडून महिलेचे ३ तोळ्याचे गंठण लंपास

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

पंढरपूर शहरात मंगळसूत्र,गंठण पळविण्याचा घटना वारंवार घडताना दिसून येतात.यात्रा कालावधीत अथवा गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी,मंदिर परिसर,एसटी बसस्थानक अशा परिसरात चोरटे हात साफ करीत असल्याचे दिसून येते.
पंढरपूर शहराचे सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावीच्या वाल्मिकीनगर परिसरात फिर्यादी महिला या दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजनेच्या सुमारास हळदी कुंकू सभारंभासाठी चालत निघालेल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील ४५ ग्राम वजनाचे गंठण हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने गंठण हाताने घट्ट दाबून धरण्याचा प्रयत्न केला.मात्र काही भाग हातात राहिला व उर्वरित भाग चोरटयांनी लंपास केला.
सदर प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago