डान्सर गौतमी पाटील हिला अवघा महाराष्ट्र ओळखतो. तिच्या अश्लील डान्समुळे ती तरुणांईमध्ये नेहमीच चर्चेत असते. याच गौतमी पाटीलबद्दल प्रश्न विचारला असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला असून त्यांनी उर्फीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
उर्फीविरुद्ध सातत्याने कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांच्याकडून होत आहे. परंतु त्यांनी अद्याप गौतमी पाटीलबद्दल काही भूमिका का घेतली नाही, असा प्रश्न एका पत्रकाराने चित्रा वाघ यांना विचारला. यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, त्यांना गौतमी पाटील कोण आहे आणि ती काय करते हे माहिती नाही. जर माहिती असते तर मी नक्कीच आवाज उठवला असता आणि कारवाईची मागणी केली असती.
पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, गौतमी पाटील कोण आहे हे मला माहित नाही. गौतमी पाटील अश्लील डान्स करत असेल तर तिचा विरोध करायला पाहिजे. गौतमीच्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे पाठवल्या असत्या तर मी त्यावर बोलले असते. मनोरंजन क्षेत्र आणि माझा दूर दूरपर्यंत संबंध नाही. गौतमी पाटील अश्लील डान्स करत हे तुमच्यापर्यंत आलं. म्हणजे ही गोष्ट इतर महिला नेत्यांकडेही आली असेलच. मग मग त्या चित्रा वाघची वाट पाहत होत्या का?
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…