ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे.घर बांधणाऱ्या गवंडीसोबत अवैध संबंध असल्यामुळे एका महिलेने पतीची हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर तिने त्याचा मृतदेह शेजारच्या निर्माणाधीन घराच्या सेप्टिक टँकमध्ये पुरला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गवंडीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पत्नी नीतू आणि तिला मदत करणाऱ्या आरोपी मजुराचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं
बुलंदशहरच्या दरावर गावात राहणारे सतीश पाल हे ग्रेटर नोएडा पश्चिम येथील सरस्वती कुंजमध्ये पत्नी आणि ५ वर्षांच्या मुलासह राहत होते.सतीश पाल नोएडा येथील एका एक्सपोर्ट कंपनीत काम करायचे. हरपालच्या घराच्या बांधकामादरम्यान त्याच्या पत्नीते गवंडीसोबत सूत जुळले. त्यांनतर अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतिचा तिने गंवडी आणि मजूराच्या साहाय्याने काटा काढला. नीतू आणि हरपाल यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सतीश पाल यांची गळा आवळून हत्या केली. आणखी एका मजुरासह साहाय्याने दोघांनी सतीश पालचा मृतदेह शेजारच्या निर्णाणाधीन घराच्या सेप्टिक टँकमध्ये पुरला. मृतदेहावर गाडून त्यावर सिमेंट दगडा टाकून बांधकाम केलं
2 जानेवारी पासून सतीश पाल बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला. या बद्दल पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा आरोपी नीतू राजमिस्त्री हरपालसोबत पळून गेली होती. दरम्यान नातेवाइकांनी दिलेल्या माहितीवरून बिसरख कोतवाली पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. रात्री उशिरा पोलिसांनी शेजाच्या घरातून मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या प्रकरणी सध्या गवंडीला अटक करण्यात आली असून आरोपी पत्नी नीतू आणि मजूर यांनाही लवकरच अटक करण्यात येईल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…