ताज्याघडामोडी

आठ महिन्याच्या गर्भवतीला बाईकला बांधून फरफटत नेलं

कंझावला प्रकरणानंतर देशाचं वातावरण ढवळून निघालेलं असताना उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे असाच संतापजनक प्रकार घडला आहे. आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला बाईकसोबत बांधून नवऱ्याने गावातील गल्ल्यांमध्ये फरफटत नेल्याची घटना घडली आहे.

 घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपी नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना घुंघचाई गावातील आहे. पीडित महिलेच्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे. त्याचं नाव राम गोपाल असं आहे. शनिवारी या जोडप्यामध्ये काही वाद झाला होता. त्या वादामुळे चिडलेल्या रामगोपाल याने बायकोला ठार मारण्याच्या हेतून बाईकला बांधलं आणि तिला गावातील गल्ल्यांमध्ये फरफटत घेऊन गेला.

राम गोपाल याला पोलिसांनी अटक केली असून पीडितेवर उपचार सुरू आहेत. पीडिता आठ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे. नवऱ्यानेच आपल्याला बाईकला बांधून फरफटत नेल्याचा जबाब महिलेने दिला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago