सोशल मीडियावर नेहमीच अनेक मनोरंजक गोष्टी व्हायरल होतं असतात. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे माघ मेळा सुरू आहे.
मेळ्यामध्ये नेहमीच अनेक चकीत करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यात काही साधू बाबांच्या केसांच्या जटा अनेकांचे लक्ष वेधतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका साधू बाबाचा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. हे बाबा चक्क गव्हाची शेती घेऊन यात्रेमध्ये आले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका साधू बाबांनी चक्क त्यांच्या डोक्यावर केसांमध्ये गव्हाची शेती केली आहे. चकित करणारी बाबा म्हणजे पेरलेले गहू आता थोडे उंच उगवले देखील आहेत. यात्रेत आलेल्या सर्व भाविकांचे लक्ष हे बाबा स्वत:कडे वेधून घेत आहेत.
मकर संक्रांती निमित्त अनेक भाविक माघ मेळाव्यात दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येथील संगम तटवरती स्नान घेण्यासाठी भक्तांची गर्दी उफाळून आली आहे. अशात इथे आलेल्या साधू बाबांच्या डोक्यावरील शेती पाहून सगळेच त्यांच्याबरोबर सेल्फी घेतानाही दिसत आहेत. अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साधू बाबांबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…