ताज्याघडामोडी

पुण्यात अख्ख्या कुटुंबाने एकत्र आयुष्य संपवलं

शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि आर्थिक नैराश्यातून एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मुंढवा परिसरात केशवनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. आत्महत्या केलेल्यामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

दीपक थोटे, इंदू थोटे, मुलगा ऋषिकेश थोटे, मुलगी समीक्षा थोटे अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. संबंधित कुटुंबीय मूळचे अमरावतीचे असून दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. मुलाचे वय २१ तर मुलीचे वय १७ होते.

मुंढवा परिसरात संबंधित थोटे कुटुंब राहत होते. मागील काही दिवसांपासून संबंधित दाम्पत्याने शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवली होती. मात्र, त्यांना तोटा झाल्यामुळे पती-पत्नी आर्थिक समस्येने मानसिक तणावाखाली होते. कौटुंबिक गरजा भागविताना त्यांची आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी २१ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून नंतर पती- पत्नीने औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago