पती-पत्नीने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना चिपळूणमध्ये घडली आहे. येथील अलोरे चेंबरी याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संजय सदा निकम (वय ३३ वर्षे) आणि सोनाली संजय निकम (वय २५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत.
संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता. आज दुपारी दोघेही मजुरीचे काम करून आपल्या घरी आले आणि त्यांनी जेवणातून विष घेऊन ते झोपी गेले होते. सायंकाळी बकऱ्या चरायला घेऊन गेलेली आजी घरी परतल्यानंतर त्यांनी या दोघा नवरा-बायकोला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावलं.
त्यानंतर या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या संपूर्ण घटनेबाबत मृत पती-पत्नीच्या आजी यांनी रात्री उशिरा शिरगाव पोलीस स्थानकामध्ये तक्रार करण्यासाठी धाव घेतली आहे. हे दोघेही पती-पत्नी शेतावरून काम करून आले त्यानंतर दुपारच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान या दोन्ही मृतदेहांना कामथे पोलीस ठाण्यात आणले असून या घटनेचे वृत्त कळताच अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनीही कामथे रुग्णालयात या सगळ्या घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, या इतके टोकाच पाऊल उचलत आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…